मोठे लक्ष्य आणि मोठ्या विजयात इंग्लंडने मोडली भारताची ‘मोनोपोली’

Maharashtra Today

इंग्लंडने भारताविरुध्दचा (England Vs India) दुसरा वन डे (ODI) सामना 337 धावांचे लक्ष्य असतानाही तब्बल 39 चेंडू शिल्लक राखून जिंकला. 330 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य असताना वन डे इंटरनॕशनलमधील हा दुसरा सर्वाधिक चेंडू राखून विजय आहे तर इंग्लंडचा 300 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना हा सर्वाधिक चेंडू राखून विजय आहे. याआधी त्यांनी 2015 मध्ये 350 धावा करताना न्यूझीलंडवर 36 चेंडू राखून विजय मिळवला होता.

अशा सर्वाधिक चेंडू शिल्लक राखून मिळवलेले 300 पेक्षा अधिक धावांचे टॉप 10 विजय पाहिले तर त्यात 4 विजय भारताचे आणि 4 विजय इंग्लंडचे आहेत. पुण्यातील विजयासह इंग्लंडने अशा मोठ्या विजयातील मोनोपोली मोडली आहे.

सर्वाधिक चेंडू राखून गाठलेले मोठे विजयी लक्ष

लक्ष्य – षटकं – विजयी संघ – विरुध्द —– वर्ष

360 – 43.3 – भारत ——–आॕस्ट्रेलिया – 2013
359 – 44.5 – इंग्लंड ——- पाकिस्तान – 2019
350 – 44.0 – इंग्लंड ——- न्यूझीलंड — 2015
337 – 43.3 – इंग्लंड ——- भारत ——- 2021
323 – 42.1 – भारत ——– विंडीज —– 2018
322 – 37.3 – श्रीलंका —— इंग्लंड —— 2006
322 – 41.3 – बांगलादेश — विंडीज —- 2019
321 – 36.4 – भारत ——– श्रीलंका —- 2012
311 – 44.4 – इंग्लंड ——– आॕस्ट्रेलिया- 2018
300 – 42.1 – भारत ——– पाकिस्तान – 2008

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER