इंग्लंडने धावांच्या बरसातीत केले षटकारांचेही विक्रम

India Vs England

भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या (India Vs England) दुसऱ्या वन डे सामन्यात शुक्रवारी पुणे (Pune) येथे धावांसह षटकारांची बरसात झाली. सामन्यात इंग्लंडकडून 20 आणि भारताकडून 14 असे एकूण 34 षटकार (Sixers) लागले. हे एखाद्या वन डे इंटरनॅशनल सामन्यात लागलेले तिसरे सर्वाधिक षटकार ठरले.

एका सामन्यात 30 पेक्षा अधिक षटकार

षटकार- धावा—– सामना ————– वर्ष
46 —– 778 – वेस्ट इंडिज वि. इंग्लंड – 2019
38 —– 693 – भारत वि. आॕस्ट्रेलिया – 2013
34 —– 648 – भारत वि. इंग्लंड ——- 2021
33 —– 626 – इंग्लंड वि. अफगणिस्तान- 2019
31 —– 701 – न्यूझीलंड वि. भारत —- 2009
31 —– 627 – न्यूझीलंड वि. विंडीज — 2015

(*या धावांमध्ये अवांतरच्या धावा नाहीत)

या डावात इंग्लंडने लगावलेले 20 षटकार हे एखाद्या संघाने एका डावात लगावलेले सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक षटकार ठरले आणि भारतीय गोलंदाजांनी केवळ दुसऱ्यांदाच डावात 20 षटकार स्विकारले.

वन डे सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार

षटकार- धावा—–संघ —– विरुध्द ——– वर्ष
25 —– 388— इंग्लंड — अफगणिस्तान – 2019
24 —– 407— इंग्लंड — वेस्ट इंडिज —– 2019
23 —– 342 — विंडीज – इंग्लंड ———– 2019
22 —– 281 — न्यूझीलंड – विंडीज ——- 2014
22 —– 371 — विंडीज — इंग्लंड ———- 2019
21 —– 462 — इंग्लंड — आॕस्ट्रेलिया —– 2018
20 —– 427 — द. आ. — भारत ———- 2015
20 —– 321 — इंग्लंड — भारत ———- 2021

(*या धावांमध्ये अवांतरच्या धावा नाहीत)

याच प्रकारे या सामन्यात आपला फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या गोलंदाजीवर तब्बल आठ षटकार लगावले गेले. वन डे सामन्यात एखाद्या गोलंदाजाला लगावले गेलेले हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक षटकार ठरले.

याबाबतचा विक्रम अफगणिस्तानच्या राशिद खानच्या (Rashid Khan) नावावर आहे. 2019 च्या विश्वचषक सामन्यात इंग्लंडने 6 बाद 397 धावा करताना राशिद खानच्या गोलंदाजीवर तब्बल 11षटकार लगावले होते आणि त्याच्या 9 षटकात 110 धावा वसूल केल्या होत्या. इंग्लंडने जिंकलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ओईन माॕर्गन याने 148 धावांची खेळी करताना एकट्याने विक्रमी 17 षटकार लगावले होते.

त्याच्याआधी त्याच वर्षी ब्रिजटाऊन येथील सामन्यात विंडीज फलंदाजांनी इंग्लंडच्या मोईन अलीला 9 षटकार लगावले होते. ख्रिस गेलने एकट्याने त्या सामन्यात 12 षटकार लगावले होते आणि मोईन अलीच्या 10 षटकात 85 धावा निघाल्या होत्या. मात्र तरीही इंग्लंडने तो सामना जिंकला होता.

त्यानंतर आता पूणे येथे इंग्लंडने 43.3 षटकांतच 4 बाद 337 धावा करताना कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर 8 षटकार लगावले आणि त्याच्या 10 षटकात 84 धावा निघाल्या. या डावात बेन स्टोक्सने आपल्या झंझावाती खेळीत 10 षटकार लगावले.

बेन स्टोक्सने 10 षटकार लगावले तरी त्याचे शतक मात्र फक्त एका धावेने हुकले आणि त्यामुळेच वन डे सामन्यांतील बिगर शतकी खेळीत सर्वाधिक षटकारांचा विक्रम त्याच्या नावावर लागला.

बिगर शतकी वन डे खेळीत सर्वाधिक षटकार
10– बेन स्टोक्स (इंग्लंड) वि. भारत- 2021
9—- एस. प्रसन्ना (श्रीलंका) वि. आयर्लंड – 2016 (प्रसन्नाने 95 धावा केल्या)
9—- ख्रिस गेल (विंडीज) वि. इंग्लंड – 2019 (गेलने 77 धावा केल्या.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER