गौ पालनातून इंजिनिअर युवक कमावतोय लाखो रुपये

Engineer youth Jashmir is earning lakhs of rupees from Dairy farming

आजच्या काळात युवा वर्ग मोठ्याप्रमाणात शेतीकडे पाठ फिरवताना दिसतोय. पण याला अपवाद ठरलाय एक इंजिनिअर युवक. ज्यानं डेअरी फार्मिंगच्या (Dairy farming) माध्यमातून लाखोंची उलाढाल असलेला व्यवसाय उभारलाय.

केरळच्या मलप्पुरमचा रहिवासी असलेल्या जशमीरची (Engineer youth Jashmir) ही गोष्ट. २५ वर्षीय बी. टेक. ग्रॅज्यूएट जमशीरनं लहानपणापासून शेती आणि पशु चिकित्सेची आवड होती. आणि नंतर त्याची आवड व्यवसाय बनली.

शिक्षण आणि प्रशिक्षण

जमशीरला डेअरी व्यवसायासंबंधी सैद्धांतिक माहिती नव्हती. यामुळं त्याला येत्या काळात अनेक अडचणींना तोंड द्याव लागणार आहे हे त्याला माहिती होत. यावर उपाय म्हणून केरळच्या वायनाड जिल्ह्यातील ‘केरळ पशुचिकित्सा आणि पशु विज्ञान विद्यापीठ’ येथे त्यान प्रवेश मिळवला. आणि दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स त्याने पुर्ण केला.

तर दुसऱ्या बाजूला या व्यवसायाचे व्यवहारिक पैलू समजण्यासाठी त्याने सुरुवातीच्या काळात दोन गायी आणि पाच बकऱ्या खरेदी केल्या. नंतर त्याचं मिनी फार्म विकसीत करण्यासाठी तीन गायी आणखी खरेदी केल्या. आणि त्याच्या या व्यवसायाला मिनी फार्मच स्वरुप आल. यानंतर त्याने डेअरि इंजीनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

“अनेकांनी मला निराश करण्याचा प्रयत्न केला डेअरि फार्मिंगमध्ये काही फायदा नाही, हे शिक्षण अर्धवट सोडण्यासाठी मला ते लोक प्रोत्साहित करत होते. पण मी इंजिनिअरींगची अभ्यास सुरु ठेवली. इंजीनिअरींग आणि मिनीफार्म दोन्हीवर लक्ष्य ठेवलं. आणि याच प्रकारे माझा कोर्स २०२०पर्यंत शिक्षण पुर्ण केलं.” शिक्षणाबद्दल जमशीरनं एका मुलाखतीत सांगितलं.

२०१७-१८मध्ये कर्ज घेवून त्यांनी राहत्यागावी पीसीएम फार्म सुरु केला. यात ४० गाईंचे पालन सुरु केले. त्यातल्या २८ गायी दुधाळ होत्या. यातून रोज २७० ते ३०० लिटर दुधाचे उत्पन्न घेतलं जातं. आणि एक लाख रुपये प्रतिमाह यातून कमावत आहेत. उत्पन्न होणारं दुध मिलमा नावच्या डेअरिला विकलं जातं जी केरल सहकरी दुग्ध विपणन महासंघ’ याच्या अंतर्गत येतं.

आज त्यांच्या ‘सेमी हाई टेक’ फार्म मध्ये जर्सी, होल्स्टीन फ्रीजियन क्रॉस आणि इतर अन्य प्रजातींच्या गायी आहेत. गाईंच्या चाऱ्यासाठी ते स्वतःच्या शेतात चारा उत्पादित करायला सुरुवात केली. ऑटोमॅटीक वाटर बाउल पद्धीनं नेहमी ताजं पाणी मिळतं.फार्ममध्ये तापमान कमी करण्यासाठी छतावर पंखे लावण्यात आलेत. ‘मिस्ट युनिट कुलिंग सिस्टम’ पर्यंत ही व्यवस्था आहे. गायींना आरामासाठी फरशीवर ‘रबर मॅट’ लावण्यात आलीये.

संगीताच्या सह्याने जनावरांवर होणारा परिणाम ध्यानात घेवून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. संगीतामुळं गायींना आराम करायला मदत मिळते. आरामामुळं चांगलं दुध उत्पादन घेता येते.

कोरोनामुळं बदलला दृष्टीकोन

“अनेक युवकांनी डेअरी व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे विचारणा केली. अनेक पदवीधर युवक डेअरी फार्मिंग व्यवसाय करते आहेत. केरळच्या कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा यांचं कौतूक केलंय. आज शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. माहितीच्या अभावामुळं शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. आधी शेती दुय्यम मानली जायची पण कोरोनामुळं लोकांचा दृष्टी कोन बदलला आहे. मोठ्याप्रमाणात युवा वर्ग शेतीकडे वळतो आहे.” असं जमशीर सांगतो.

कोरोना आणि लॉकडाउनमुळं अनेकांना शहरातल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ते लोक गावी परतले. पण शेती करायची की नाही. त्यातून उत्पन्न मिळेल की नाही असे अनेकांना प्रश्न आहेत. अशा लोकांसाठी जशमीरनं एक आदर्श ठेवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER