बॉलिवूड संपवण्याचे, अन्यत्र हलवण्याचे प्रयत्न सहन करणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा

CM Thackeray

मुंबई :- अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणापासून बॉलिवूडमधील कलाकारांवर आरोप करणे सुरू आहे. ड्रग्जप्रकरणात अनेक कलाकारांची नावे घेतली जात आहेत. याबाबत नापसंती व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इशारा दिला की, बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे  प्रकार सहन केले जाणार नाहीत.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, उत्तरप्रदेशात राज्य सरकारने चित्रपट नगरी उभारण्याचे काम सुरू केले आहे.

कोरोनामुळे (Corona) राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिले.

ते म्हणालेत – मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज इथे हॉलिवूड सिनेमांच्या तोडीस तोड सिनेमे बनत आहेत. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हे मनोरंजनाचे एक मोठे उद्योग क्षेत्र असून, या क्षेत्राने अनेकांना रोजगार दिले आहेत. सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठरावीक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करणे सुरू आहे, हे अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहात आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER