ओपन स्पेस व इतर जागेवरील अतिक्रमणे : प्रशासक डॉ. बलकवडे

कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : महापालिकेच्या ओपन स्पेस व इतर जागेवरील अतिक्रमणे येत्या आठ दिवसात संबंधितांनी स्वत:हून हटवावीत, अन्यथा ती जप्त करण्याबरोबरच कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश आज प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे (Dr. Balkwade) यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.

शहरामध्ये मोठया प्रमाणात अतिक्रमण वाढले असलेने त्याचा आढावा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घेतला. यावेळी प्रामुख्याने महापालिकेच्या ओपन स्पेस व इतर जागेतील असलेले अतिक्रमण, केबीन्स, स्टॉल व इतर साहित्य नगररचना विभाग, विभागीय कार्यालय, इस्टेट विभाग यांनी संयुक्त फिरती करुन ते काढणेबाबत नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना ओपन स्पेस व इतर जागेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी तिन्ही विभागांना आठ दिवसाचा कालावधी दिला असून या दरम्यान महापालिकेच्या अशा जागेवर अतिक्रमण केलेल्या संबंधीतांनी आपण स्वत:हून आठ दिवसात सदरचे अतिक्रमण हटवावे अशी सूचना त्यांनी केली.

या कालावधीमध्ये संबंधीतांनी सदरचे अतिक्रमण न काढलेस सदरचे साहित्य महापालिकेच्यावतीने काढून जप्त करण्याची सूचनाही केली.

शहरातील जे फेरीवाले आहेत त्यांनी महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमाच्या चौकटीत राहूनच आपला व्यवसाय करावयाचा आहे. त्याचप्रमाणे दुकानदारांनी आपले दुकान सोडून बाहेर अतिक्रमण केले असल्यास ते तात्काळ काढावे अन्यथा ते साहित्य जप्त करण्याच्या सुचना शहर अभियंता यांना दिल्या. महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करणे गरजेचे असून जे व्यावसायिक हे नियम पाळत नसतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER