
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान समितीने (युजीसी) (UGC’s letter) सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरुंना विद्यार्थ्यांनी गाय विज्ञान ( cow science) शिकावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन कामधेनू गाय विज्ञान प्रचार आणि प्रसार परीक्षाना बसण्यास सांगण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे देशभरातील विद्यार्थ्यांचे गाय विज्ञानाबाबतची समज कितपत आहे हे जोखता येईल. ही परीक्षा देशभरात २५ फेब्रुवारीला होणार आहे.
युजीसीचे सचिव राजनिश जैन यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक सर्व कुलगुरुंना पाठवण्यात आले आहे. याचबरोबर या परिपत्रकात विद्यापीठाशी सलग्नित असलेल्या महाविद्यालयांनाही याबाबतची माहिती देण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.
या परिपत्रकात ‘मी तुम्हाला विनंती करतो की गाय विज्ञानाच्या परीक्षेला बसण्यास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा. याचबरोबर तुमच्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनाही याबाबतची माहिती द्या.’ असे लिहिण्यात आले आहे. ही गाय विज्ञानाची परीक्षा राष्ट्रीय कामधेनू आयोग आयोजित करते. हा आयोग मासेमारी, पशु पालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. हा आयोग भारताच्या देशी गायींबाबतच्या आर्थिक, वैज्ञानिक, आरोग्य, कृषी आणि आध्यात्मिक आदी प्रसार करण्याचे काम करते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला