गाई दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन द्या, योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

Yogi Adityanath - Maharashtra Today

लखनौ : सध्या उत्तर प्रदेशमध्ये शहरी भागातही मोकाट जनावरांची समस्या जाणवू लागली असल्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महापौर आणि नगरसेवकांना आवाहन केले की, लोकांना गाई दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. राज्यातल्या शहरी भागातल्या लोकप्रतिनिधींशी योगी आदित्यनाथ यांनी याबाबत ऑनलाईन संवाद साधला.

योगी म्हणाले, मोकाट जनावरांची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारही प्रयत्न करत आहे. मात्र, समाजाने जागरुक करण्याची गरज आहे. गाय फक्त कुटार खात नाही. गाईंसाठी चाऱ्याची व्यवस्था करणेही आवश्यक आहे. योगी यांनी स्थानिक प्रशासनाला एक वार्षिक रक्कम ठरवून देण्याचे आदेश दिले. ही रक्कम ३०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान असेल. एखादी व्यक्ती स्वतःच्या नावावर गाय दत्तक घेऊन तिच्या खर्चासाठी ही ठराविक रक्कम देऊ शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button