इम्रान हाश्मीच्या ‘टायगर्स’चा पोस्टर रिलीज

tigers posture release

बॉलिवूडचा सिरीयल किसर अभिनेता इम्रान हाश्मी याचा अपकमिं ‘टायगर्स’ या चित्रपटाचा पोस्टर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा पोस्टर इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केला आहे. टायगर्स या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी याने एका सेल्समनची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे दिग्ददर्शन ऑस्कर पुरस्कार विजेता डेनिस टोनोव्हिक याने केले असल्याने चाहत्यांमध्ये टायगर्स बाबत कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, इम्रानने पोस्ट केलेल्या पोस्टर मध्ये तो ‘फॉर्मल’ कपडे व खांद्यावर ‘लेदर’ बॅग अशा टिपिकल सेल्समनच्या रूपामध्ये दिसत आहे. इम्रानच्या ‘टायगर्स’च्या पोस्टरला आतापर्यंत जवळपास ४३ हजार लाईक्स मिळाले आहेत.