इमरान हाश्मीने शर्टलेस फोटो शेअर करत दाखवले आपले ऍब्स

Emraan Hashmi

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता इमरान हाश्मी आपल्या फिटनेसबाबत खूप सतर्क राहतो. स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तो दररोज कसरत करतो. आता त्याने त्याचा एक शॉर्टलेस फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याचा पिळदार शरीर दिसत आहे. मात्र या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनवर अधिक लक्ष वेधले गेले आहे.

इम्रानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शर्टलेस दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “चार ऐब्स आ गए हैं, दो आने बाकी हैं. बटर चिकन नहीं खाया होता तो वे भी दिख जाते. ”इमरान हाश्मीच्या या ट्विटवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

इम्रानच्या व्यावसायिक आयुष्याविषयी (Professional Life) बोलताना तो ‘मुंबई सागा’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात तो कॉपची भूमिका साकारत आहे. ८० च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर सेट केलेला हा गॅंगस्टर पीरियड चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता करीत आहेत.

सांगण्यात येते की त्याआधी ऋषी कपूरसोबत सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘द बॉडी’ मध्ये दिसला होता. ज्यात त्याने ऋषी कपूर सोबत काम केले होते. याशिवाय इम्रान हाश्मीकडे ‘फेस’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ सारखे चित्रपटही आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER