पंतप्रधानांच्या वाढदिवशी वचनपूर्ती; चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून दिली रोजगार संधी

Chandrakant Patil on PM's birthday

पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ७० वा वाढदिवस आहे. देशभर पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सोशल मीडियावर शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला आहे. राज्यातही भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबवले आहेत.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लॉकडाऊन काळात रोजगार गेलेल्यांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. तसेच याचा मोबदलाही देणार असे घोषित  केले होते. त्याची पूर्ती आज त्यांनी मोदींच्या वाढदिवशी पुणे कोथरूडमधील कार्यालयात पूर्ण केली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर ज्यांचे हातावर पोट आहे, अशांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अशा होतकरू  व गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे निश्चित केले होते.

यामध्ये या गरजू व्यक्तींमधील कलागुणांच्या अनुषंगाने एक महिन्याचा रोजगार आणि त्याचा मोबदला देण्यात येणार होता. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक गरजूंनी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. या सर्वांचे कलागुण जाणून त्यांना योग्य तो रोजगार मिळवून देण्याची जबाबदारी मतदारसंघाचे प्रचार आणि प्रसिद्धी प्रमुख रणजित हगवणे आणि पक्षाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या उल्का मोकसदार यांच्याकडे सोपवली होती.

या दोघांनीही ही जबाबदारी लीलया सांभाळली. या दोघांनी त्यांच्या मुलाखती घेऊन, कौशल्य गुणाच्या अनुषंगाने रोजगाराच्या संधी मिळवून दिल्यात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सर्वांना त्यांच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER