जुनी पेंशनच्या मागणीसाठी कर्मचारी संघटना आक्रमक

20 ऑगस्टला राज्यव्यापी संपाची हाक

Old Pension protest

ठाणे : 31 ऑक्टोबर 2005 नंतर सरकारी- निमसरकारी सेवेत आलेल्या कर्मचार्‍यांना 1982 व 84 ची पेंशन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटने राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील संघटना जिल्हाधिकारी कार्यलयासह ताहसिलदार कार्यालायावर 20 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

ऑगस्ट 2018 मध्ये कर्माचारी संघटना तीन दिवस संपावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यां सोबत झालेल्या चर्चेत कर्मचार्‍यांना अनेक आश्वासने दिली होती. परंतु, या आश्वासनांची अकरा महिन्यानंतर देखिल कोणतीही पुर्तता झाली नाही किंवा त्यावर साधी बैठक सुद्धा झाली नाही. या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी कर्मचारी संघटनांनी 3 जुलै हा लक्षवेधी दिवस पाळून सर्व जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली होती.राज्य शासनातील 1 नोव्हे.2005 नंतरचे कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. या मागणीचा विचार करण्यासाठी स्थापण करण्यात आलेल्या समितीची कार्यकक्षा मर्यादित ठेवण्यात आली आहे. सदर समिती अंशदायी पेंशन योजनेतील केवळ त्रुटींचा अभ्यास करणार असल्याने कर्मचार्‍यांची मूळ मागणी जुनी पेंशन लागू करा याची पूर्तता करणारी नाही.याबाबतीत महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनने अतिशय आक्रमकरीत्या 24 जूनला मुंबई येथे अर्धनग्न आंदोलन करून शासनाचा निषेध केला. त्यात या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील 2005 नंतरचे सर्व कर्मचारी सहभागी होणार असून 2005 नंतरच्या कर्मचार्‍यांनीही आपल्या विविध मागण्यांणची पुर्तता न झाल्याने सरकारी- निमसरकारी कर्मचारी, शिक्षक यांच्यामध्ये फार मोठा असंतोष धुमसत आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी सर्व कर्मचारी 20 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संपावर जाणार आहेत. या संपात यशस्वी करण्याचे आवाहन जुनी पेंशन हक्क संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष विनोद लुटे यांनी केले आहे.