कोल्हापुरात संपर्क शोधण्यावर भर : सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर : ज्या भागात कोरोना (Corona) बाधितांची संख्या वाढत आहे अशा भागांवर अधिक लक्ष केंद्रीत करा. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती शोधण्यावर जास्तीत जास्त भर देऊन वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज दिली.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात म्हणाले, खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची माहिती आणि डिस्चार्ज रुग्णांची माहिती सहायक आयुक्तांनी रोजच्या रोज घ्यावी. ही माहिती डॅशबोर्डवर अपलोड करुन नियंत्रण कक्षातून नियोजन करावे. खासगी रुग्णालयांनीही सकाळी आणि संध्याकाळी रुग्णांबाबतचा डाटा भरावा तालुकास्तरावरील, ग्रामस्तरावरील ग्राम समिती, प्रभाग समिती यांना पुन्हा एकदा सक्रिय करा. आशा स्वयंसेविका, आरोग्यसेवक यांची तपासणी यंत्रणांनाही सक्रिय करा. ज्या भागामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यू वाढत आहेत अशा तालुक्यांवर, भागांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन रुग्णांच्या जास्तीत जास्त संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्यात भर द्यावा. त्यांची वेळीच दक्षता घ्यावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER