
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केले आहे. या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी(उद्या) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आयोजत केली आहे. कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहीमेची रणनीती काँग्रेसकडून आखण्यात येणार आहे. पक्ष संघटना बळकटीसाठी २४ ते २६ फेब्रुवारीला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठका होणार आहेत.
यात काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार.
बैठकांचे नियोजन?
जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहेत. या बैठकीत मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे २४ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता, मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी दुपारी १२ वाजता, कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी दुपारी २ वाजता वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी आणि दुपारी ४ वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे.
दुसरीकडे, गुरुवारी औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवार २६ फेब्रुवारीला यवतमाळ, चंद्रपूर व काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार. तर संध्याकाळी ४ वाजता भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला