भावुक क्षण ; राज ठाकरे मुलाला पाहण्यासाठी पोहोचले लीलावती हॉस्पिटलमध्ये

Raj Thackeray Visits Amit Thackeray

मुंबई : रण्यात आले आहे.मुलाला दाखल करण्यात आल्यानंतर मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) पोहोचले आहे.

अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप आला होता, तसंच प्रकृतीही ठीक नव्हती. त्यामुळे अखेर खबरदारी म्हणून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आज दुपारी 12.15 च्या सुमारास राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या पदाधिकाऱ्यांसह लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहे.

लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर अमित ठाकरे यांची कोविड-19 (COVID-19) ची चाचणी करण्यात आली. पण, सुदैवाने कोविडची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. तसंच मलेरिया आणि इतरही चाचण्या करण्यात आल्या आहे. पण, त्यांचेही रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे. व्हायरल फिव्हर असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पण, कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून पुढील दोन ते तीन दिवस त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER