मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आडकाठी ही आणीबाणीच – देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Devendra Fadnavis

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आडकाठी करीत आहे, ही राज्यातील अघोषित आणिबाणीच आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

काल फडणवीस यांनी रिपब्लीक टीव्हीच्या (Republic TV) सीईओंना अटक करण्याच्या घटनेचा उल्लेख करून राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा खोडून काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडूनच देशातील विविध घटकांची मुस्काटदाबी करून आणीबाणीजन्य स्थिती निर्माण केली जात असल्याचा पलटवार केला होता. त्यावर फडणवीस यांनी आज पुन्हा अघोषित आणीबाणीचा आरोप केला आहे.

फडणवीस म्हणालेत, मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या (Central Government) संबंधात बोलण्याऐवजी महाराष्ट्रातील स्थितीबाबत प्रथम बोलले पाहिजे. आरक्षणाच्या विषयावर मराठा संघटनांना राज्यात आंदोलन करायचे आहे पण, करू दिले जात नाही.

राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने एक रूपयांचीही मदत केली नाही असा आरोपही फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री अमेरिका, रशिया, दिल्लीत काय घडते यावर बोलतात पण महाराष्ट्रात त्यांनी काय केले आहे त्यावर काही बोलत नाहीत. राज्यातले मंत्रीही त्यांनी काय केले यावर बोलतील तेव्हा उघडे पडतील असा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER