आणीबाणी २.० : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर मुख्यमंत्री ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे पोस्टर

emergency_2.0

नवी दिल्ली :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या (Atnab Goswami) अटकेचे पडसाद आता राजधानी दिल्लीतही उमटले आहे. गोस्वामींच्या अटकेविरोधात भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. गोस्वामी यांच्या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपाकडून १९७५च्या आणीबाणीशी केली जात आहे. त्यातच आता भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी चक्क दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी २.० (Emergency-2.0) लागल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचं पोस्टर लावलं आहे.

वास्तुविशारद असलेले अन्वय नाईक यांनी अलिबाग येथे आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (५ नोव्हेंबर) ताब्यात घेण्यात आलं. रायगड पोलिसांनी केलेल्या या अटकेवरून भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्यातील भाजपा नेत्यांनी या घटनेची तुलना आणीबाणीशी केली. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही टीकास्त्र सोडले आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची बंद केलेली फाईल पुन्हा उघडी करून अर्णब  गोस्वामी यांची अटक करणे म्हणजे राज्य सरकारची ठोकशाही आहे. गोस्वामी यांची अटक म्हणजे पत्रकारितेचा गळा दाबण्याचे काम आहे. राज्य सरकारने चालवलेली दडपशाही ही आणीबाणी असल्यासारखं वाटत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र भाजपाकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच दिल्लीतील भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी थेट महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर लावत महाराष्ट्रात आणीबाणी २.० लागल्याचा दावा केला. महाराष्ट्र सदनाबाहेर लावण्यात आलेल्या या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो आहेत. ‘आणीबाणी २.०मध्ये आपलं स्वागत आहे’ असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा : पडद्यामागून दिल्लीतून काय काय हालचाली सुरू आहेत हे जर मी सांगितलं तर सगळ्यांची पळता भुई थोडी होईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER