एल्गार परिषद,ट्रॅक्टर रॅली चालते मग शिवजयंतीलाच अटी कशासाठी? सरकारच्या निर्णयावर भाजपचा संताप

Girish Mahajan-Uddhav Thackeray

मुंबई :-  एल्गार परिषदेला परवानगी दिली जाते काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली मोठ्या गर्दीने निघते मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी उपस्थितीची अट कशाला? असा सवाल भाजपने केला असून शिवजयंती मोठ्या उपस्थित उत्साहाने साजरी करणार आता निर्धार केला आहे.

कोरोनाचे संकट असतानाही एल्गार परिषदेला परवानगी दिली जाते, मुंबईत विरोधकांचा विराट शेतकरी मोर्चा निघू शकतो. नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ट्रॅक्टर घेऊन रॅली काढू शकतात, मग केवळ शिवजयंतीवरच बंधन का ? असा सवाल भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. तुमच्या कार्यक्रमांना कोरोनाची अडचण येत नाही, मग लोकांवर निर्बंध कशासाठी ? कोरोनाच्या संकटाची जाणीव आम्हालाही आहे व सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून ढोल-ताशांच्या गजरात याही वर्षी शिवजयंती साजरी केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासंदर्भात  गृह विभागाने काही बदल केले आहेत. त्यानुसार, शिवजयंती उत्सवासाठी १० ऐवजी १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारी काढलेल्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये उपस्थितीची वाट दहा होती ती आता १०० करण्यात आली आहे.

शिवजयंती गड किल्ल्यावर साजरी न करता ती घरातच साधेपणाने साजरी करावी. जयंती उत्सवावेळी १० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. सदर कार्यक्रमांचे आयोजन आॅनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करावी, असे परिपत्रक गृह विभागाने काढले होते. परंतु शिवप्रेमींच्या आग्रहामुळे उपस्थितीची मर्यादा आता नवा आदेश काढून १०० पर्यंत वाढवण्यात आली.

कोरोनाचे संकट अजून टळलेले नसल्याने यंदा कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी गृहविभागाने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER