एल्गार परिषद : कडक पोलीस बंदोबस्त; कोणतेही मोठे राजकीय नाव नाही

Strict police coverage In Yalgar Parishad

पुणे : पुण्यात आज एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या एल्गार परिषदेला खरं तर याआधी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी परवानगी न दिल्यास परिषद रस्त्यावर घेऊ असे सांगितले व अखेर या परिषदेसाठी परवानगी मिळवून घेतली. बी.जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील श्री गणेश क्रीडा कला मंचावर ही परिषद होणार आहे.

या परिषदेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिषदेच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. साध्या वेशातील पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या एल्गार परिषदेसाठी मोठी खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. केवळ २०० लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार आहे. त्यामध्ये कोणतंही मोठं राजकीय नाव नाही. दिवसभर होणाऱ्या या परिषदेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि पोवाड्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER