मराठा समाजाचा एल्गार; बीडमध्ये ५ जूनला पहिला मोर्चा निघणारच : विनायक मेटे

Vinayak Mete - Maharashtra Today

बीड :- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) ५ जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच, अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी घेतली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी ५ जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. या मोर्च्याची  तयारी युद्धपातळीवर सुरू असून ५ तारखेला मोर्चा होणारच, असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

‘५ जूनला सकाळी १०:३० वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार असून या मोर्च्याला परवानगी मिळो अथवा नाही; पण मोर्चा होणारच’ असा निर्णय बैठकीत झाला आहे. या वेळी या मोर्च्याचे नाव ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा’ असे असणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे, अशी माहिती मेटे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : मराठा आमदार-खासदारांनी माघार घेतली तर बघाच ;संभाजीराजे आरक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button