कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार : कोल्हापूर बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर :- नवे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून एल्गार पुकारला आहे. आंदोलनाला पाठिंबा देत कोल्हापूरकरांनी आज कडकडीत बंद पळाला.

केंद्र शासनाच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील विविधराजकीय पक्ष, संघटना सहभागी होणार असून त्यांनी कडकडीत बंद पाळण्याची हाक दिली आहे. मालवाहतूक, खासगी प्रवासी वाहतूक बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बाजारपेठाही बंद आहेत. यामुळे जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जात आहे. दूध, औषध आदी अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. कोल्हापूरकरांनी (Kolhapur) कडकडीत बंद पाळत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER