एल्गार परिषद; अटकेत असलेले वरवरा राव यांना कोरोना

Elgar Council; Corona to Varvara Rao in custody

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले कवी-कार्यकर्ते वरवरा राव (८१) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या कारागृहात असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राव यांच्यावर माओवादी चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप आहे. डिसेंबर २०१७ मध्ये भीमा कोरेगावला झालेल्या दंगलींना एल्गार परिषदेमुळे प्रोत्साहन मिळाले, असा आरोप आहे. तेलुगू कवी आणि कार्यकर्ते राव यांना पोलिसांनी या संदर्भात अटक केली होती. कारागृहात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आता मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये हलवण्याची शक्यता आहे.

वरवरा राव यांनी सोमवारी त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. तब्येत खालावलेली असल्याने जामीन मिळावा, अशी त्यांची विनंती होती. न्यायालयाने जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER