एल्गार परिषद खटला; ९ आरोपींना मुंबईच्या कारागृहात हलविले

Elgar Parishad Case

पुणे : एल्गार परिषद गुन्ह्यातील नऊ आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कोर्टाच्या आदेशाने मुंबईतील भायखळा व ऑर्थर रोड जेलमध्ये हलविण्यात आले. या आरोपींना २८ तारखेच्या आत एनआयएच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

दिल्ली हिंसाचार : पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

केंद्र सरकारने एल्गार परिषद गुन्हा एनआयएकडे तपासासाठी दिला आहे. त्यानंतर पुण्यातील कोर्टाने देखील या गुन्ह्याची सर्व कागदपत्रे एनआयए कोर्टात पाठविण्याचे परवानगी दिली होती. तसेच, या गुन्ह्यातील नऊ आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत एनआयए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते.

आता एल्गार परिषद खटला मुंबईतील एनआयएच्या कोर्टात चालणार आहे. या गुन्ह्यातील नऊ आरोपी – सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, वर्णन गोन्साल्वीस, सुधीर ढवळे, रोना विल्सन, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, शोमा सेन आणि वरवरा राव येरवडा मध्यवर्ती कारागृहात होते. एनआयए कोर्टाच्या आदेशानुसार येरवडा मध्यवर्ती कारागृहातील या नऊ आरोपींना बुधवारी मुंबईला हलविण्यात आले. त्यामधील सात आरोपी ऑर्थर रोड कारागृहात, तर दोन महिला आरोपींना भायखळा कारागृहात ठेवण्यात येणार आहेत.

एल्गार परिषद गुन्ह्यात सुरूवातीला राज्य व केंद्र सरकार यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, नंतर राज्य सरकारने हा गुन्हा एनआयएकडे वर्ग करण्यास समंती दिली. तरीही राज्य सरकारमधील काही घटक पक्षांकडून या गुन्ह्यात समांतर तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी सुरू होती. याबाबत कायदेशीर सल्ला मागविल्या असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.


Web Title : Elgar council case the accused were shifted to the mumbai jail

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)