एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे; लवकरच ठरेल राज्य सरकारचं भवितव्य? – प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar

नवी दिल्ली : एल्गार प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र विकास आघाडीत बिघाड होण्याचे संकेत देत आहे. एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. मात्र या निर्णयावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. तर प्रकाश आंबेडकरांनीही एनआयएकडे तपास देणे चुकीचा आहे. असे म्हटले आहे.
एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवताना गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचा विरोध होता. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करत तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीच्या मैत्रीत बेबनाव आल्याचं दिसतं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीकोनातून १ एप्रिल महत्वाचा दिवस आहे, १ एप्रिलपासून एनआरपी लागू होणार आहे. त्याबाबतसुद्धा राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नाही, अंमलबजावणी करण्यात तिन्ही पक्षाचं एकमत असेल तर सरकार टीकतं.एनआरपी बाबत महाविकास आघाडीत मतभेद आहेत. त्यामुळे लोक काय ते निर्णय घेतील असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

उपमुख्यमंत्री माझे ऐकणारे, तर मुख्यमंत्री त्यांचे ऐकणारे – शरद पवार

दरम्यान, सरकारमध्ये जे पक्ष बसलेत त्यांचे विचार अन् मतदार वेगळे आहेत. अगोदर एक निर्णय घेतला जातो, गृहमंत्री वेगळी भूमिका घेतात आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकाराचा वापर करुन हा तपास एनआयएकडे देण्याची भूमिका घेतली. राज्य सरकारमध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होतोय असं दिसायला लागलं त्यामुळे संशय निर्माण होतोय, त्यामुळे एकंदरित शासनात एकमत होतंय असं दिसत नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी एनआयएकडे तपास वर्ग केल्यानंतर भूमिका काय घेते हे पाहावं लागेल, शाब्दिक नाराजी व्यक्त करणार की कृतीतून हे दिसेल हे आगामी काळात स्पष्ट होईल अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे.