एल्गार परिषद : आरोपींना खोट्या आरोपात अडकवले; नातेवाइकांचा आरोप

Elgaar Parishad case

एल्गार परिषद प्रकरणात (Elgaar Parishad case) अटक झालेल्या आरोपींच्या कुटुंबीय, वकील आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी ऑनलाईन आभासी बैठक (Online virtual meeting) घेऊन आरोप केला की, सरकारने त्यांना खोट्या आरोपात फसवले आहे.

१ जानेवारी २०१८ ला भीमा – कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी (Cases of violence) पुणे पोलिसांनी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन, अरुण फेरेरा, व्हर्नन गोन्साल्विस, पी. वरवरा राव, शोमा सेन आणि सुधा भारद्वाज यांच्यासह नऊ जणांना पुणे येथे अटक केली. यानंतर एनआयएने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा आणि हनी बाबू यांच्यासह इतर तीन जणांना या वर्षी अटक केली आहे.

जेनी रोवेना म्हणाल्या की, आम्ही सामाजिक न्याय आणि आरक्षण आणि भेदभाव याबाबत आवाज उठवला हा आमचा गुन्हा आहे. गेल्या वर्षी आमच्या घरावर धाड टाकण्यात आली. कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता माझा लॅपटॉप जप्त करण्यात आला. त्यात एक फोल्डर लपवले होते, असे सांगण्यात आले. जेनी यांनी आरोप केला की, नंतर त्यात कोणतेही फोल्डर टाकता येऊ शकते.

सुधा भारद्वाज या वकील आहेत आणि छत्तीसगड येथे काम करतात. त्यांनी आरोग्याचे कारण देऊन कोरोनाच्या कारणावरून अंतरिम जमानत मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याच आठवड्यात त्यांचा अर्ज फेटाळला आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांची कन्या मायाशा उपहासाने म्हणाली की, दोन वैद्यकीय अहवालात म्हटले होते की, सुधा यांना हृदयविकाराचा आजार होतो आहे. आता सांगत आहेत की, त्यांचा हृदयविकार बरा झाला आहे. भायखळ्याच्या महिला कारागृहात हृदयरोग दुरुस्त होत असतील तर हृदयविकाराच्या रुग्णांवर तिथेच उपचार केले पाहिजे !

नवलखा याची सहकारी साहब हुसेन म्हणाली की, आरोपींना तुरुंगातील मूलभूत सुविधा नाकारल्या जात आहेत. आरोपींना घाबरवण्यासाठी हे केले जात आहे. दिल्ली दंगल आणि इतरही प्रकरणात असेच करतात.

सिव्हिल लिबर्टीजच्या पीपल्स युनियनतर्फे आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ वकील रेबेका जॉन आणि मिहिर देसाई यांच्यासह इतर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER