एका खोलीचे घर, विलगीकरणात अकरा दिवस राहिला झाडावर!

हैदराबाद : कोरोनाचे (Corona Virus) गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन (गृह-विलगीकरणा) (Home isolation) चा सल्ला दिला जातो. मात्र, अनेक कुटुंब एका खोलीत राहतात; अशा रुग्णांची अडचण होते. यावर एका रुग्णाने अफलातून उपाय शोधला, ११ दिवस घरासमोरच्या झाडावर राहिला!

नालगोंडा जिल्ह्यातील शहरापासून लांबच्या कोठानंदीकोंडा गावातील अठरा वर्षांचा शिवा हा तरुण हैदराबादमध्ये ग्रॅज्युएशन करतो. लॉकडाऊनच्या काळात तो घरी आला. कोरोनाची लक्षण दिसल्यानंतर त्याने चाचणी करून घेतली. चार मे रोजी ‘पॉझिटिव्ह’ रिपोर्ट आला. पण, लक्षण गंभीर नसल्याने त्याला घरीच ‘आयसोलेट’ हो, घरच्यांपासून दूर राहा, असे सांगण्यात आले.

शिवाच्या घरी एकच खोली आहे. कुटुंबात चार सदस्य आहेत. गावात आयसोलेशन सेंटर नाही. काय करायचे, प्रश्न निर्माण झाला. शिवाने अफलातून उपाय शोधला, विलगीकरणात ११ दिवस घराजवळच्या झाडावर रहायचे ठरवले.

गादी आणि दोर – बदली घेऊन झाडावर गेला. फांद्या एकातएक अडकवून त्यावर गादी अंथरली. घरचे लोक डबा घेऊन आले की बादली खाली सोडून डबा वर घ्यायचा. वेळ घालवण्यासाठी सोबत मोबाईलही ठेवला होता. असे ११ दिवस विलगीकरणात काढले. आता शिवाची प्रकृती चांगली आहे.

कोठानंदीकोंडा गावात सुमारे ३५० कुटुंब राहातात. हा परिसर छोट्या आदिवासी गावांमधील एक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून पाच किलोमीटर दूर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button