वीज बिल ५० टक्के माफ केले! अजित पवारांचा दावा

Ajit Pawar

पुणे :- वीज बिलावरचे (Electricity bill) व्याज आणि दंड माफ केला आहे. ५० टक्के वीज बिल माफ केले आहे. यासाठी निधी बाजूला काढला आहे, अशी माहिती अर्थ व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. भाजपा अकारण वाढीव वीज बिल माफीसाठी आंदोलन करते आहे, असा आरोप त्यांनी केला.

भाजपाच्या वीज बिलविरोधी आंदोलनाबाबत अजित पवारांनी शंका व नाराजी व्यक्त केली. वीज बिलावरून कारण नसताना भाजपाकडून गैरसमज पसरवला जातो आहे. इंधन दरवाढीविरोधातील आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा वीज बिलांवरून आंदोलन करत नाही ना, अशी शंका व्यक्त केली.

पुण्यामध्ये आज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या  भूमिपूजन सोहळ्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणालेत, वीज बिलावरचे शक्य असलेले व्याज आणि दंड माफ केला आहे. ५० टक्के वीज बिल माफ केले आहे. यासाठी निधीदेखील बाजूला काढलेला आहे. पण हे भाजपावाले कशासाठी आंदोलन करत आहेत ठाऊक नाही.

ही बातमी पण वाचा : राज्यपालांनी अंत पाहू नये ; अजित पवार संताप अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER