वीज बिल आंदोलन : कोल्हापुरात झळकले पायतानाचे होर्डिंग

Electricity Bill Movement:

कोल्हापूर : कोरोना काळातील वीज बिल भरमसाठ (Electricity Bill Movement) आल्याने वीज ग्राहकांत संतप्त भावना आहेत. सर्वपक्षीय कृती समितीने वीज बिलांविरोधात आंदोलने, निदर्शने करत महावितरणला टाळे ठोकले. घरगुती वीज बिले शासनाने मान्य करावीत, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मिरजकर तिकटीला वीज बिल भरणार नसल्याचा फलक उभारला आहे. वीज बिल वसुलीसाठी कोणी आले तर त्याला कोणत्या भाषेत उत्तर दिले जाईल, याचा इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे संपर्कासाठी समितीतील कार्यकर्त्यांचे नंबरही झळकले आहेत.

कोल्हापूर घरगुती वीज बिले न भरण्याचा पवित्रा घेत वीज बिल भरणार नाही कृती समितीने मिरजकर तिकटी येथे उभारलेला फलक चर्चेचा विषय ठरला आहे. सहा महिन्यांचे वीज बिल माफ करा, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळातील वीज मागणाऱ्या सरकारला, वीज कट करणाऱ्याला, जनतेवर जबरदस्ती करणाऱ्याला, खणखणीत झटका अस्सल कोल्हापुरी तेल लावलेले पायताण, असा आशही फलकावर झळकवला गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER