‘लातों के भूत बातों से…’ राज ठाकरेंच्या या वाक्यानुसार मनसे संघर्ष करण्याच्या तयारीत

raj thackeray and uddhav thackeray

मुंबई : लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलात सवलत देण्यास ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी नकार दिल्यामुळे विरोधकांनी रान पेटवले आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनही राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. लातों के भूत बातों से नहीं मानते’ म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
त्यामुळे आता राज्य सरकार वीजबिलाच्या मुद्यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण”लाथो के भूत बातों से नही मानते” असं म्हणत देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, वाढीव वीज देयकांच्या विषयावर आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक असून, नेते आणि सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी दुपारी २ वाजता मनसे पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. वाढीव वीज देयकांवर घेतलेल्या यू-टर्नवर सरकारला घेरण्यासाठी बैठकीत आंदोलनाची व्यूहरचना ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत वीज बिलासंदर्भात आंदोलनाची रणनीती आखली जाणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER