वीज बिलाचा वाद : काहीतरी गडबड आहे; जयंत पाटलांच्या वक्तव्यावर नीलेश राणे यांची टीका

Jayant Patil - Nilesh Rane

मुंबई : वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर इच्छा असूनही मी बोलू शकत नाही असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) म्हणालेत. यामुळे या प्रकरणात नक्कीच काहीतरी गडबड आहे, अशी शंका माजी खासदार व भाजपाचे (BJP) नेते नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी व्यक्त केली आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत नंतर पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वीज बिलांमधील (Electricity Bills) वादावर भाष्य केले.

ते म्हणालेत – विविध वर्गातील वीज ग्राहकांकडे सध्या ६७ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळं वीज मंडळ संकटात आले आहे. वीज पुरविणारी व्यवस्थाच भाजपाच्या सत्तेच्या काळात अडचणीत आली असून तिची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विजेच्या थकबाकिची वसुली कशी करायची, नागरिकांना सवलती कशा व किती द्यायच्या, याकडे सरकार लक्ष देते आहे. आचारसंहिता असल्याने माझी इच्छा असूनही मी यावर उत्तर देऊ शकत नाही, असे पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ देत नीलेश राणे यांनी ठाकरे सरकावर (Thackeray Government) टीका केली. ‘जयंत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री सुद्धा आचारसंहितेचे कारण सांगून वीज बिलासंदर्भात बोलायला टाळतात, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे,’ असे ट्वीटमध्ये ते म्हणाले. गरिबांसाठी राज्य सरकार ५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊ शकत नाही ही फालतुगिरी आहे, असा टोमणा त्यांनी मारला.

राणे यांनी कालही ट्विट करून सरकारवर टीका केली होती – ‘अगोदर माझे कुटुंब माझी जबाबदारी, आता माझे लाईट बिल माझी जबाबदारी! ठाकरे सरकार सुधारणार नाही. प्रत्येक गोष्ट ही लोकांची जबाबदारी असेल तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलय काय?’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER