अन्यथा जनभावनेचा उद्रेक होऊ शकतो : राज ठाकरेंचा अदानीच्या अधिकाऱ्यांना इशारा

Raj Thackeray - Adani Group

मुंबई : लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात आलेल्या वाढीव वीज बिलांवरून मनसे (MNS) आक्रमक पवित्रा घेतला होता . पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. मनसेचे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी या भेटीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

‘वाढीव वीज बिलातून सर्वसामान्यांना दिलासा द्या, अन्यथा उद्रेक होऊ जनभावनेचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा राज यांनी अदानीच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे . अदानी समूहाचे सीईओ शर्मा यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली

‘कोरोनामुळे गेल्या काही महिन्यात लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे . या संकट काळात विजेची बिलं जास्त आली आहेत. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. पुढील दिवसांत बिलं कमी करून दिलासा दिला नाही तर लोकभावनेचा उद्रेक होऊ शकतो. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल, ती कोणाच्याच हातात राहणार नाही,’ असे राज ठाकरे यांनी अदानीच्या (Adani Group) अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली .

दरम्यान ‘वीज कंपन्या व्यवसाय करत आहेत हे खरं असलं तरी अपवादात्मक परिस्थितीत लोकांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे. मनसे लोकांसोबत राहील असेही कंपन्यांना बजावण्यात आल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER