कोल्हापुरातील 439 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पुढील वर्षी

GramPanchayat Election Next Year

कोल्हापूर : कोरोनाच्या (Corona) पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यात निवडणूक प्रक्रिया स्थगित केलेल्या ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या एकूण 439 ग्रामपंचायतींच्या (439 Grampanchayat) सार्वत्रिक निवडणूका लांबण्याची शक्यता आहे. या निवडणुका पुढील वर्षी परिस्थिती सुधारल्यानंतरच घ्याव्यात असा सार्वत्रिक सूर आहे. याबाबत जिल्हा प्रशासन सोमवारी (दि.21) राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करणार आहे.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायवरील प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानूसार या सर्व ग्रामपंचायतीवरही मुदत संपेल तसे प्रशासक नेमण्याची कार्यवाही होईल अशीही शक्यता आहे. जिल्ह्यात एप्रिल ते जून 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीत मुदत संपणार्‍या शाहूवाडी तालुक्यातील कुंभवडे व मांजरे, पन्हाळा तालुक्यातील पोंबरे आणि चंदगड तालुक्यातील चिंचणे या चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. जिल्हा परिषदेकडून या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची काम सुरू आहे. एका प्रशासनाकडे किमान तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER