काँग्रेस कार्यकारिणीसाठी निवडणूक व्हावी : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई :- काँग्रेसने नियुक्ती पद्धत बंद करून, निवडणुकांच्या माध्यमाने कार्यकारिणी निवडावी, तरच चांगले नेते पुढे येतील’, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जावा, असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : येत्या 1 मार्च रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन

काँग्रेस कार्यकारिणीसाठी आधी निवडणूक होत होती. तेव्हा काही निवडून येत, काही अध्यक्ष नियुक्त करीत आणि जुन्या-नव्याचा संगम साधला जाई. आता फक्त नियुक्ती होते. त्यामुळे युवक काँग्रेसचे नेते आणि गुलामनबींसारखे ज्येष्ठ नेते सारखेच झाले. निवड थांबल्याने नेतृत्व विकास थांबला. निवड आणि नियुक्ती पद्धतीने तरुण आणि ज्येष्ठांचा समन्वय साधला जावा.’असे चव्हाण म्हणाले .