निवडणूक प्रक्रिया १५ दिवसांनी कमी होण्याची शक्यता

पुणे : अंतीम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर साधारण ४५ दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण केला जातो. आता कोरोनाच्या (Corona Virus)  पार्श्वभूमीवी ३० दिवसात निवडणूक प्रक्रिया (Election process) पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसा लवकरच शासन आदेश निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दूध महापालिका या महत्वाच्या संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तिन्ही संस्थांची मतदार यादी अंतीम करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कोल्हापूर महापालिकेची अंतीम यादी १२ मार्चला प्रसिध्द होईल. याच दिवशी कल्याण- डोंबवली महापालिकेचा १८ गावांच्या हद्दवाढीबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी आहे. कोल्हापूरसह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांंचा कार्यक्रम एकत्रच जाहीर होत असल्याचा अनुभव आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर १५ मार्चच्या दरम्यान या महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा येत्या काही महिन्यात महापालिका आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण व्हाव्यात, यासाठी प्रयत्न आहे. दरम्यान, कोरोना महामारीची दुसरी लाटेचं सर्वच निवडणुकांवर सावट आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम कालावधी कमी केल्यास अंतीम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर ३० दिवसात मतदान आणि मतमोजणी पूर्ण होईल.

या निर्णयाचा निवडणूक यंत्रणेपेक्षा राजकीयस्तरावर मोठी धावपळ होणार आहे. निवडणूक कार्यक्रम कमी केल्यास याचा लाभ संबंधित संस्थेतील सत्ताधारी आघाडीचा अधिक होण्याची अटकळ आहे. महापालिका क्षेत्रात अंतीम टप्प्यात विकास कामे उरकण्याची घाई सुरू आहे. यासह महाविकास आघाडीची निवडणुकीची तयारीवरच निवडणूक कार्यक्रम कालावधीबाबत निर्णय होईल, असे सुत्रांनी सांगितले.

कोरोना महामारी असताना बिहार सारख्या मोठ्या राज्यातील निवडणुका पूर्ण झाल्या. महाराष्ट्रात कोरोना वाढत असला तरी निवडणुका होणाऱ्या जिल्ह्यात रिकव्हरी रेट चांगला आहे. यानिकषावर निवडणुका जलदगतीने उरकण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER