कल्याण डोंबिवलीची निवडणूक लांबणीवर शक्य : कोल्हापूरसह नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबादचे लक्ष

Kalyan Dombivli

मुंबई : कोल्हापूरसह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूरसह १५ ते २० नगरपालिका, काही नगरपंचायती यांच्या निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेचा हद्दवाढीचा विषय सुप्रिम कोर्टात असून त्याची सुनावणी १२ मार्चला होणार आहे. त्यामुळे कल्याण- डोंबिवली वगळून इतर महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरसह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांंचा कार्यक्रम एकत्रच जाहीर होत असल्याचा अनुभव आहे. या पाचही महापालिकांचे आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत १८ गावांचा समावेशावरुन सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. याबाबत शुक्रवारी (दि.२२) सुनावणी झाली. न्यायालयाने १२ मार्चला पुढील सुनावणी घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. कल्याण-डोंबिवली डोंबिवली महापालिकेने १८ गावे वगळून आरक्षण सोडत काढली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीची निवडणूक मार्चनंतर घेवून इतर महापालिकांची निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होवू शकतो.

पहिल्या टप्प्यात १४ हजार ग्रामपंचाती आणि त्यानंतर पाच महापालिका तसेच २० नगरपालिका, काही नगरपंचायती यांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन सुरु आहे. याशिवाय निवडणूक कार्यक्रम ४५ दिवसांऐवजी ३० दिवसांवर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मार्च महिन्यात कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. गोकुळसह जिल्हा बँकेची रणधुमाळी असल्याने तत्पूर्वी महापालिकेची निवडणूक घेतली जावू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER