सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. मात्र, आता राज्याच्या काही भागांसह देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी पुढे जातील, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

कराड येथे एका कार्यक्रमात मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी मुदत संपलेल्या राज्यातील सर्व सहकारीसंस्थांच्या निवडणुका यापूर्वीच ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबरनंतर पुढील सहा महिन्यांत म्हणजेच जून २०२१ पर्यंत या सर्व निवडणुका घेण्याचा शासनाचा विचार होता. मात्र, आता परिस्थिती बदलल आहे. निवडणुका पुढे ढकलतान विशिष्ट परिस्थितीचा विचार करण्यात आला होता.

आता राज्यातील काह भागात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाद लागला आहे. दिल्लीसह देशातील काही राज्यांत पुन्हा निर्बंध लागले आहेत. महाराष्ट्रातही राज्यशासनाकडून लोकांना सुरक्षितता म्हणून नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी पुढे ढकलाव्या लागण्याची चिन्हे असल्याचे स्पष्ट संकेत पाटील यांनी दिले.

साखर कारखानदारीबाबत बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील यांनी, यावर्षी राज्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उसाचे गाळप झाले पाहिजे, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी दिली आहे. शासनाने अडचणीतील ३२ कारखान्यांना ५३१ कोटींची थकहमी दिली आहे, असे सांगत राज्यात यावर्षी सर्व उसाचे गाळप करणे, हे एक मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER