कोल्हापुरात 433 ग्रामपंचायतींचा निवडणूका

कोल्हापुरात 433 ग्रामपंचायतींचा निवडणूका

कोल्हापूर : जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच तालुक्यांत ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Elections) होत आहेत. मात्र, कागल, शिरोळ आणि गडहिंग्लज या तीन ठिकाणी संपूर्ण तालुक्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अन्य तालुक्यांत मात्र ज्या गावात निवडणूक आहे, त्या गावापुरतीच आचारसंहिता लागू होणार आहे.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींचे एकूण ग्रामपंचायतींच्या 50 टक्क्यांपेक्षा जादा प्रमाण असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यासाठी अथवा संपूर्ण तालुक्यासाठी आचारसंहिता लागू केली जाते.जिल्ह्यातील 1,025 ग्रामपंचायतींपैकी 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत हे प्रमाण 42 टक्के इतके आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता लागू राहणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांत मात्र सर्वत्र आचारसंहिता लागू होणार आहे. कागल तालुक्यात एकूण 83 ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी 53 म्हणजे सुमारे 63.85 टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. शिरोळ तालुक्यातील 52 पैकी 33 म्हणजेच 63.85 टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील 89 पैकी 50 म्हणजे 56.17 टक्के ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. यामुळे या तिन्ही तालुक्यांत संपूर्ण आचारसंहिता लागू राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER