काँग्रेसचा प्रश्न : कोरोना काळात निवडणूक सभा होतात, मग हिवाळी अधिवेशन का नाही?

Randeep Surjewala

दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द झाल्याची माहिती आज संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. यावर टीका करताना काँग्रेसने म्हटले – कोरोनाच्या साथीच्या काळात बिहार-बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा शक्य आहेत तर संसदेचे हिवाळी अधिवेशन  (Winter Session) का नाही?

काँग्रेसने आक्षेप घेतला आहे की, हा निर्णय घेण्याअगोदर आमच्याशी चर्चा करण्यात आली नाही. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ट्विट केले – “कोरोना काळात NEET/JEE व IAS सारख्या परीक्षा शक्य आहेत.

शाळांमध्ये वर्ग, विद्यापीठांमध्ये परीक्षा शक्य आहेत. बिहार-बंगालमध्ये निवडणुकीच्या  प्रचार सभा शक्य आहेत. मग संसदेचे हिवाळी अधिवेशन का नाही? जर संसदेत जनतेचे मुद्देच मांडले जाणार नाहीत तर लोकाशाहीचा अर्थ काय राहील?” काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरून जोरदार आंदोलन सुरू आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे, असे अधीररंजन चौधरी म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER