नागपूर महापौर, उपमहापौर पदासाठी आज निवडणूक

Nagpur Municipal Corporation

नागपूर : नागपुरचे महापौर संदिप जोशी (Sandeep Joshi) यांनी आपल्या महापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नागपुर महापौर, उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे. ही निवडणूकऑनलाइन पद्धतीनं होणारआहे. भाजपकडून महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी तर उपमहापौर पदासाठी मनीषा धावडे (Manisha Dhawade) उमेदवार आहेत.

नागपूरमध्ये (Nagpur) काँग्रेसची (Congress) गटबाजी कायम आहे. कॉंग्रेसकडून महापौर पदासाठी दोन तर उपमहापौर पदासाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगमात आहेत. आज सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीनं ही निवड प्रक्रिया सुरु होईल.

तर, ॲानलाईन निवडणुकीला भाजप (BJP) नेते धर्मपाल मेश्राम (Dharmpal Meshram) यांचा विरोध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER