माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच निवडणूक

यवतमाळ : राज्याला सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेले वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या गावात स्वातंत्र्या नंतर प्रथमच निवडणूक झाली. नाईक यांच्या पुसद तालुक्यातील गहूली येथे प्रथमच निवडणूक झाली. एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत नाईक गटाने विरोधी गटाला धूळ चारली.

पुसद तालुक्यातील गहूली हे माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांचे मूळ गाव. एक हजार लोकसंख्येच्या या गावात आजवर बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न राबविण्यात आला. सात सदस्यीय ही ग्रामपंचायत आहे. यावेळी देखील सर्वसंमतीने सदस्यांची निवड करण्यात येणार होती. त्यानुसार सहा सदस्यांची निवड देखील झाली. मात्र, एका जागेसाठी घोडे अडले. या जागेसाठी विलास जगनसिंग आडे व अशोक चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली. गावातील 630 पैकी 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानुसार विलास आडे यांना 308 तर विरोधी उमेदवाराला अवघी 121 मते मिळाली. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या गावात पहिल्यांदाच निवडणूक झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER