राज्यसभेच्या ११ जागांसाठी ९ नोव्हेंबरला निवडणूक

Election Commission

दिल्ली : राज्यसभेच्या ११ जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. ९ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल घोषित होणार आहे. या ११ पैकी १० जागा उत्तरप्रदेशातील असून एक उत्तराखंड येथील आहे. या सदस्यांचा कार्यकाळ २५ नोव्हेंबरला संपतो आहे.

२७ ऑक्टोबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. २८ ला अर्जांची पडताळणी होईल व २ नोव्हेंबरपर्यंत नावं मागे घेता येतील.

उत्तरप्रदेशातून सपाचे ४, भाजपाचे ३, बसपा २ आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. पक्षांच्या बळानुसार भाजपा ८ आणि सपा १ जागा जिंकू शकते. विरोधी सपा, बसपा आणि काँग्रेससोबत आलेत तर ते दहावी जागा जिंकू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER