निवडणूक आयोगाचा ममतादीदींना दणका, २४ तासांसाठी प्रचारावर बंदी!

Election Commission-Mamata Banerjee

कोलकाता :- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ४ टप्प्यांचं मतदान झालं आहे. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकारण तापत चाललं आहे. आता निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मोठा दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) ममता बॅनर्जी यांना २४ तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. पुढील २४ तास ममता बॅनर्जी निवडणुकीत प्रचार करु शकणार नाहीत. आज रात्री ८ पासून ते १३ एप्रिल रात्री ८ पर्यंत ममता बॅनर्जी यांना कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.

निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. हा आरोप बरोबर असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. तसंच एका प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी हिंदू-मुस्लिम अशा धार्मिकतेच्या आधारावर मतं मागितली होती. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात ममता बॅनर्जी यांच्या काही वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला. त्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं.

दरम्यान, निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षपाती आहे. लोकशाहीसाठी आज हा दिवस काळा दिवस आहे, असं तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी या धरणे आंदोलन करणार आहेत. निवडणूक आयोगाविरोधात आपण कोलकाता उद्या दुपारी १२ वाजेपासून गांधी पुतळ्याजवळ आपण धरणे आंदोलनाला बसणार आहोत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button