निवडणूक आयोगाच्या वकिलाने मतभेदांमुळे दिला राजीनामा

Election Commission lawyer resigns - Maharashtra Today

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची सध्याची कार्यपद्धती माझ्या नीतामूल्यांशी मेळ खाणारी नाही, असे नमूद करत आयोगाचे सर्वोच्च न्यायालयातील स्थायी पॅनेलवरील वकील अ‍ॅड. मोहित डी. राम यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आहे. अ‍ॅड. राम सन २१०३ पासून सर्वोच्च न्यायालयात आयोगाचे वकील म्हणून काम पाहात होते.

आयोगाच्या कायदा विभागाच्या संचालकांना राम यांनी हे राजीनाम्याचे पत्र पाठविले. आयोगाचे वकील म्हणून सर्वोच्च न्यायालयात काम करता आले, हा मी माझा गौरव समजतो व माझ्या वकील म्हणून प्रगतीच्या मार्गावरील तो एक संस्मरणीय टप्पा असल्याचे मी मानतो, असे राम यांनी पत्रात नमूद केले.

न्यायालयीन कामकाजात न्यायाधीशांकडून केल्या जाणाºया तोंडी मतप्रदर्शनास प्रसिद्धी देण्यास माध्यमांना मनाई करावी, अशी याचिका करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला गुरुवारीच फटकारले होते. मात्र त्या प्रकरणात अ‍ॅड. राम आयोगाचे वकील नव्हते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button