बिहारमध्ये मावळा फुंकणार शिवसेनेची ‘तुतारी’

अखेर आयोगाने चिन्ह बदलले

CM Uddhav Thackeray

मुंबई :- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Vidhansabha Election) निवडणूक आयोगाने शिवसेनेला (Shivsena) ‘बिस्किट’ हे चिन्ह दिले होते. त्यानंतर शिवसेनेने आयोगाला पत्र लिहीत चिन्ह बदलून द्यावे, अशी मागणी केली होती. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य करत शिवसेनेला ‘तुतारी (Tutari) वाजवणारा मावळा’ हे चिन्ह दिले आहे.

ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असे शिवसेनेने निवडणूक आयोगाला सुचवले होते; पण ही तीनही चिन्हे आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे काल कळवले. निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला शिवसेनेची पसंती आहे.

ही बातमी पण वाचा : ‘बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती नाही’, राष्ट्रवादीचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER