निवडणूक येताच शिवसेनेला औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव आठवतो – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

नागपूर :- फक्त निवडणूक जवळ आल्यावरच शिवसेनेला (Shiv Sena) औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराचा मुद्दा आठवतो. आतादेखील महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार असल्याने शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल, अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

ते शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेतला. काँग्रेसने संभाजीनगर नावाला विरोध केला काय किंवा नाही काय, पण शिवसेना हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता वापरत आहे. काँग्रेस (Congress) केवळ सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करत आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्तीचा सुरु असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

तसेच फडणवीस यांनी यंदाच्या वर्षात राज्य सरकार शेतकरी आणि मजुरांना मदत करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 2020 हे वर्ष आव्हानात्मक होतं, 2021 हे वर्ष सुखा समाधानाचं जावो हीच शुभेच्छा असल्याचेही फडणवीसांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : राज्य सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं दुःखद – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER