विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर

Vidhan Bhawan

मुंबई : विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होईल. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. करोना (Corona) संसर्गामुळे सुमारे ५ महिने ही निवडणूक लांबली आहे.

ऐन दिवाळीच्या उत्सवात निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होईल. १२ नोव्हेंबर हा नामांकनाचा अखेरचा दिवस, १३ तारखेला छाननी व १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल.

१ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER