बलात्कारप्रकरणी वृद्धाला २० वर्षांचा तुरुंगवास

Rape -jail

दिल्ली : नोएडामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका वृद्धाला २० वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचबरोबर २० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्या व्यक्तीचे नाव बनवारी लाल (६५) असून नोएडा येथील रहिवासी आहे. २०१८ साली बनवारीने ६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. पीडितेच्या कुटुंबाने बनवारीविरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आले.

या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने सुनावणीदरम्यान पीडितेचा वैद्यकीय चाचणी अहवाल आणि सरकारी साक्षीदाराबरोबर इतर १० साक्षीदारांचीही साक्ष घेतली. या सुनावणीत सादर झालेल्या साक्षीपुराव्यांच्याआधारे बनवारीने या मुलीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले. ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने बनवारीला २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर दंड न भरल्यास आरोपीच्या शिक्षेत आणखी वाढ करण्यात येईल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER