एकता कपूरची माघार, आहिल्याबाई होळकर वसतिगृहाच्या नावाखाली असलेले अश्लील दृश्य हटवले

Ekta Kapoor - Virgin Bhasskar 2

मुंबई : एकता कपूरच्या (Ekta Kapoor) वर्जिन भास्कर-२ या अश्लील वेबसिरीजमध्ये मुलींचे अश्लील चाळे चालणाऱ्या वस्तीगृहाचे नाव पुण्यश्लोक आहिल्याबाई छात्रवास असल्याचं ६ सप्टेंबरला निदर्शनास आलं होत. त्यामुळे धनगर समाजात मोठा संताप निर्माण झाला होता. पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या नावाचा अश्लील वेबसिरीजमध्ये होणारा वापर चुकीचा आहे. त्या सिरीजचा युट्यूबवरील ट्रेलर डिसलाईक करा अशी मोहीम सोशल मीडिया वर सुरु केली होती. त्यानंतर अखेर एकता कपूरने वेबसिरीजमध्ये असलेले अश्लील दृश्य हटवणार असल्याचे जाहीर केले.

सिरीजमध्ये ‘अहिल्याबाई’ नावाचा वापर केल्यावर समाजातील काही घटकांना दुःख झाले असून, टीमच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत आहे. ती म्हणाली की कोणाचाही अनादर नसल्याचे सांगून हे दृश्य हटवण्यात आले आहे. “ते दृश्य दिग्दर्शकांनी त्वरित काढून टाकले आहे. असे नाव वापरण्यात आले आहे जे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा अनादर वाढवणार नाही,

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या नावाच्या वस्तीगृहाचा वापर अश्लील वेबसिरीजमध्ये केल्याबद्दल एकता कपूरचा निषेध करण्यात आला होता. तसेच धनगर समाजाच्या देवतांचा अपमान करुन भावना दुखावल्याबद्दल एकता कपूरने माफी मागावी अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरून हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला होता. एकता कपूरने माफी मागितल्यानंतरही धनगर समाज आद्यपही नाराज आहे. काल यशवंत सेनेनं एकता कपूरच्या घरावर धडक देत दगडफेक केली.

त्यानंतर धनगर समाजाकडून होत असलेला विरोध लक्षात घेता एकता कपूर हिने अखेर माघार घेतली. एकता कपूरनं लिखित माफीनामा सादर करून वादग्रस्त दृश्य हटवाल्याच म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER