अ‍ॅडल्ट कंटेटच्या सिनेमासाठी एकताने स्थापन केली नवीन कंपनी

Ekta Kapoor - Anurag Kashyap - Taapsee Pannu

एकता कपूर (Ekta Kapoor) छोट्या पडद्यावरची महाराणी म्हणून ओळखली जाते. छोट्या पडद्यावर तिने अनेक हिट मालिका दिल्या आहेत. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर एकताने मोठ्या पडद्याकडे लक्ष वळवले होते. मात्र छोट्या पडद्यावर जसे यश एकताने मिळवले होते तसे यश तिला मोठ्या पडद्याने दिले नाही. तिने तयार केलेले काही सिनेमे हिट झाले पण फ्लॉपची संख्या जास्त आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी एकताने सिने निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मचे वाढते प्रस्थ आणि हातातील मोबाईलवर तरुणांना आवडणारे इरॉटिक सिनेमे देण्यासाठी तिने अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवात केली होती. यावर ‘गंदी बात’सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवण्यास सुरुवात केली. आता एकताने आणखी एक नवी कंपनी ‘कल्ट मूव्हीज’ स्थापन केली असून या कंपनीअंतर्गत अॅडल्ट कंटेंट तयार केले जाणार आहेत. या यादीतील पहिला सिनेमा आहे ‘दो बारा’.

एकतासोबत अनुरागनेही (Anurag Kashyap) या सिनेमाची निर्मिती केली आहे. या दोघांनी यापूर्वी ‘उड़ता पंजाब’ आणि ‘लुटेरा’ सिनेमांची निर्मिती केली होती. या दोघांसोबत सुनील खेत्रपाल यांची कंपनी अॅथेना आणि गौरव बोस याची कंपनी द व्हर्मिलियन वर्ल्ड प्रोडक्शन यांनीही ‘दो बारा’च्या निर्मितीत हातभार लावलेला आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. अनुरागने सिनेमाचे दिग्दर्शन तर केलेच आहे त्याने या सिनेमात कामही केले आहे. त्याच्यासोबत मुख्य भूमिका साकारत आहे तापसी पन्नू. टीझरवरून हा एक थ्रिलर सिनेमा असल्याचे जाणवते. टीझरमध्ये तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या घरात आरामात बसलेली दाखवली आहे. कंटाळलेली तापसी अॅलेक्साला सिनेमा लावण्यास सांगते. टीव्हीवर सिनेमा सुरु होतो तेव्हा स्क्रीनवर अनुराग कश्यप दिसतो. तो तापसीला सिनेमाची ऑफर देतो. इंटरअॅक्टिव्ह आणि टाईम ट्रॅव्हलिंग सिनेमाचा विषय असल्याचे यातून दिसते. तापसी अनुरागला नाव विचारते तेव्हा तो म्हणतो, सध्या जी वेळ आहे तेच माझे नाव आहे आणि सध्या जी वेळ आहे तेच माझे नाव आहे. त्याचवेळेस घड्याळात रात्रीचे 2 वाजून 12 मिनिटे झालेली दिसतात आणि सिनेमाचे नाव येते ‘दो बारा’ अनुरागने टीझर शेयर करीत जेव्हा तुम्ही यूनिव्हर्समध्ये टाईम ट्रॅव्हल करता तेव्हा पाहा काय होते. लवकरच शूटिंग सुरु होणार.

टीझरवरून सिनेमा वेगळा असेल हे जाणवत आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतरच तो प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करण्यात किती यशस्वी ठरतो ते कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER