एकनाथाजी, दिल्या घरी सुखी राहा; रावसाहेब दानवेंनी दिल्या शुभेच्छा

Raosaheb Danve & Eknath Khadse

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे (Raosaheb Danve) यांनी खडसेंना, दिल्या घरी त्यांनी सुखी राहावे अशी उपहासात्मक शुभेच्छा दिली.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना दानवे म्हणालेत, राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय खडसेंसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी भाजपा सोडायला नको होती. ज्या पक्षाने त्यांच्यावर टीका केली भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच पक्षात ते गेले! हे टाळता आले असते.

राजकारणात जरा धीर धरावा लागतो. काही काळ जावू द्यावा लागतो. खडसेंच्या बाबतीत भाजपामध्ये मतभेद नव्हते. सगळ्यांनाच ते राहावे असेच वाटत होते. मात्र काही गोष्टी या न्यायप्रविष्ट होत्या. ४० वर्ष त्यांनी पक्षाचे काम केले. तळातल्या कार्यकर्त्यापासून ते विरोधी पक्षनेते आणि मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मंत्री असा त्यांचा प्रवास झाला त्यामुळे त्यांच्या जाण्याने दु:ख झाले, असे दानवे म्हणालेत.

ते ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षानेच त्यांच्यावर टीका केली होती. खडसे थोडे थांबले असते तर सगळ निस्तरता आले आलं असते. मात्र तसे झाले नाही. आता दिल्या घरी त्यांनी सुखी राहावे. ते तिकडे गेले असले तरी ते आमचे मित्र आहेत असेही दानवे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER