पुजा चव्हाण प्रकरणी एकनाथ शिंदेंची सावध प्रतिक्रिया

Pooja Chavan - Eknath Shinde

मुंबई : पुजा चव्हाण (Pooja Chavan) तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या मोठ्या मंत्र्याचं नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. तसेच संबंधीत मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भेजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तर, या प्रकरणावर शिवसेनेची पहिलीच प्रतिक्रिया आली असून शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका टीव्ही वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. टीव्ही 9 मराठीकडे एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

तर, नेहमी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात पुढे असलेले संजय राऊत यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. प्रतिक्रिया दिली ती देखील ऑन कॅमेरा न बोलता राऊत ऑफ द रेकॉर्ड बोलले आहेत.

संपुर्ण प्रकरण पाहता विदर्भातील शिवसनेचे नेते राज्यवनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात घेतले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER